देशाचे अन् आंतरराष्ट्रीय धोरण निश्चित करून विकास करू पाहणाऱ्या संसद भवनातील लोकसभागृहात लातूरकरांच्या विकासासाठी धडपडणारा त्यांचे प्रश्न हिरीरीने मांडणारा आतापर्यंतचा एकच खासदार लातूरकरांना पहायला मिळाला आणि तो म्हणजे खासदार सुधाकर शृंगारे.
खा. सुधाकर शृंगारे यांनी लातुरच्या विकासात मोलाची भर घातलीय. लातूरच्या उत्पादनाला राष्ट्रिय – अंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी दळणवळणाचा प्रश्न लक्षात घेऊन खा. सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे पिट लाईनचा प्रश्न लाऊन धरला आणि पिट लाईन मंजूर करून घेतलीच. आता लातूरमधे रेल्वेच जाळ विस्तारलं जाईल आणि विकासाला चालना मिळेल.
दळणवळणाचा असाच एक प्रलंबित प्रश्न म्हणजे लातूर टेंभूर्णी महामार्ग. या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. शिवाय रस्ता अरुंद खड्डेमय अन् त्यावरील वाहतुकीची वर्दळ मात्र कायम, त्यामुळे या मर्गावर नेहमीच अपघात होत. अनेकांनी अपघातामध्ये आपला जीव गमावला अनेकजणांना अपंगत्व स्वीकारावे लागले. आशा अपघाती घटनांनी अस्वस्थ झालेल्या संवेदनशील मनाच्या खा. सुधाकर शृंगारे यांनी जोर लावला अन् या मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळवून घेतलीच. याशिवाय कर्नाटक महामार्गाचे कामही मार्गी लावले.
शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले. पिण्यासाठी तसच सिंचनासाठी अन् उद्योगासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक असलेल्या पाण्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना काम मिळावे, उद्योगांमध्ये महिलांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचा लातूरकरांना कसा फायदा होईल याकडे जातीने लक्ष दिले. अनेक बेघरांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
विज्ञान- तंत्रज्ञानाची कास धरून विकासाच्या मार्गावर चालत असताना संस्कृतीमध्ये रुजलेली आपली पाळेमुळे जपण्याचं काम करतानाही खा. सुधाकर शृंगारे दिसून आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करत 72 फूट उंचीचा भव्य पुतळा तसेच डॉ. बाबासाहेब यांचे नोट बुकच्या माध्यमातील भव्य चित्रं साकारून त्यांना आगळं – वेगळं अभिवादन केलं. शिवजयंती, म. बसवेश्वर जयंती, माता अहिल्याबाई होळकर, म. फुले जयंती आशा एक नव्हे अनेक महानवांच्या जयंत्या त्यांनी साजऱ्या केल्या.
राम नवमी उत्सवातही ते सहभागी झाले अन् ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी इदगाह मैदानावर जाण्यासही ते विसरले नाहित.
आपली एकोप्याची संस्कृती जपत त्यांनी लातूरच्या विकासाला चालना देण्याचं काम केलय. त्यांच्यातील हीच चिकाटी, जनतेसाठी काम करण्याचा प्रामाणिकपणा पाहून भाजप पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा त्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. आणि माझी माणसं म्हणून लतूरकरांसाठी काम करणाऱ्या खा. सुधाकर शृंगारे यांना लातूरकर आपला माणूस म्हणून पुन्हा एकदा सेवेची संधी देत प्रचंड मतांनी विजयी करतील असाच विश्वास त्यांना आहे.
लातूरकर जातपात पाहून नाही तर त्यांच्यासाठी झगडणाऱ्या, विकासाला चालना देणाऱ्या, सामाजिक सलोखा जपणाऱ्या नेत्यालाच आपलसं करतात त्यांनाच साथ देतात. हाच लातूरचा राजकीय इतिहास आहे, आणि खा. सुधाकर शृंगारे असाच लातूरकरांनी ‘आपला माणूस’ मानलेला खासदार आहे.