आमदार धीरज देशमुख यांच्या कार्यकर्तेमुळे दोन अपघातग्रस्तांचे प्राण वाचले. जखमींना त्यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून तात्काळ रुग्णालयात पोहचविले. वेळेत उपचार झाल्याने त्यांना जीवनदान मिळाले. भाऊसाहेब धंसिंग चव्हाण असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून अन्य एक जन जखमी झाला आहे.
भाऊसाहेब धनसिंग चव्हाण लातूरव्हून वसंत नजर तांड्याकडे ऑटोने निघाले होते. नेहरू नगर तांड्यावर आल्यावर वसंत नगर कडे जाण्यासाठी महामार्गावरून वळताना आंबेजोगाईकडून भरधाव आलेल्या कारने जोरची धडक दीली. या धडकेत भाऊसाहेब धनसिंग चव्हाण आणि ऑटो चालक जखमी झाले.
आता त्यांच्यावर लातूर येथिल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी संगितले असल्याची माहिती विजय मोतीराम चव्हाण यांनी सांगीतले.