लातूर – जिव्हाळ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करून महिलांना सन्मान आणि प्रोत्साहन देणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी महिलांनी खंबीरपणे उभे राहावे, त्यांना मोठे समर्थन द्यावे असे आवाहन भाजपाच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथे लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात डॉ. अर्चना पाटील चाकूरकर बोलत होत्या, याप्रसंगी भाजपाच्या नेत्या संजीवनीताई रमेशआप्पा कराड, सुप्रियाताई शृंगारे, भाजपा महिला आघाडीच्या उषाताई रोडगे, अनुसया फड, सुरेखा पुरी, शीला आचार्य त्याचबरोबर भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, रिपाईचे धम्मानंद घोडके, सिंदगावचे सरपंच सुनील चेवले, बावचीचे उपसरपंच नरेश चपटे, कोळगावचे पंकज काळे, शेरा येथील सरपंच प्रताप भुरे, भीमराव मुंडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. महिला मेळाव्यास महिलांची मोठी उपस्थिती होती.
नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता आल्यानंतरच मोठे विकासात्मक बदल घडले. महिलांचे दुःख कमी झाले, अडचणीवर मार्ग निघाले असे सांगून डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य शासनाने महिलांना केंद्रबिंदू मानून घरकुल, शौचालय, घरोघरी गॅस, मोफत अन्नधान्य प्रवासात ५० टक्के सवलत असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले., महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले. आपल्या सर्वांची आस्था असलेले प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिराची आयोध्या नगरीत उभारणी केली. विधानसभा आणि लोकसभा सभागृहात काम करण्यासाठी महिलांना ३३ % आरक्षण देणारे विधेयक मोदीजींच्या सरकारने मंजूर केले.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी आपल्या भावी पिढीच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होणे ही काळाची गरज आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शुभ आशीर्वाद द्यावेत, त्यांच्या कामांना समर्थन द्यावे असेही आवाहन अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
प्रारंभी तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनुसया फड, विस्तारक दिलीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून भाजपा महायुतीलाच साथ द्यावी खा. सुधाकर शृंगारे यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन संगमेश्वर स्वामी यांनी केले या महिला मेळाव्यास प्रतिभा उरगुंडे, सुनिता उरगुंडे, माहीम शेख, शोभा नवाडे, सुरेखा कस्पटे, सखुबाई बडे, मनीषा कारसेकर, संगीता घाटोळे, यमुना कस्पटे, रेश्मा शेख, उमा सूर्यवंशी, वंदना सूर्यवंशी त्याचबरोबर विठ्ठल कस्पटे, शिवमुर्ती उरगुंडे, पृथ्वीराज उरुगुंडे, रसूल शेख, लक्ष्मीकांत उरगुंडे, बाळू गिरी, राजाभाऊ घाटोळे, सतीश कस्पटे, अविनाश उरगुंडे, दयानंद लकडे, बाळू आप्पा माशाळकर यांच्यासह महिला पुरुष भाजपा आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.