काँग्रेस निष्ठावंत डॉ. चाकूरकर यांचा गांधी परिवाराला विसर
राहुल – प्रियंका गांधी लातुरात आले पण चाकूरकरांना न भेटताच निघून गेले
स्नुषा भाजपात गेल्याचा राग की चाकूरकरांना निष्क्रिय समजण्याची चूक?
………..
काँग्रेसचे निष्ठावान आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शिवराज पाटील चाकूरकर यांचा आज गांधी परिवाराला विसर पडल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात राहुल गांधींनी मुक्काम केला पण डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांना न भेटताच ते निघून गेले. लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधीही लातूर- उदगीरला येऊन गेल्या मात्र त्यांनी सुद्धा चाकूरकर परिवाराची चौकशीही केली नाही. यामगच नेमकं कारण काय?
डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृवावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलाय. त्यामुळे गांधी परिवार चाकूरकर परिवारावर नाराज आहे का? की आता डॉ. शिवराज पाटील चाकूरकर काय करू शकतात? आपल्याला आता यांचा उपयोग काय असे समजण्याची चूक तर गांधी परिवाराने केली नाही ना अशी चर्चा लातूरकरांमध्ये होत आहे.
मा. डॉ. शिवराज पाटील चाकूरकर लोकसभेची निवडणूक हरल्या नंतरही त्यांना इंदिरा गांधी यांनी देशाचे गृहमंत्री केले होते. गांधी परिवाराचे चाकूरकरांशी इतके घनिष्ठ संबंध असताना डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये जाणार असल्याची कुणकुण गांधी परिवाराला लागली नसेल का? त्यांचं मन वळविण्याचं काम गांधी परिवाराने का केले नसावे. का त्यांना आता चाकूरकर परिवाराची गरज उरली नाही असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.