महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आज लातूर शहरातील विष्णुदास मंगल कार्यालयात इथं ओबिसी कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आलाय. काँग्रेसचे नेते आ. अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाविकास आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी का यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला होता.त्या मेळाव्याला ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चक्क पाठ फिरवला आहे.
काँग्रेसकडून मोठी प्रचार यंत्रणा राबवली जातेय. त्यात माला जंगम असलेल्या डॉ. शिवजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली खरी पण त्यांच्या उमेदवारीने अनुसूचित जाती मधील मतदारांची मोठी नाराजी झाली आहे. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून आ. अमित देशमुखांनी माला जंगम असलेल्या डॉ शिवाजी काळगे याना उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळली खरी पण त्यातून अनुसूचित जाती नाराज झाली पण त्यासोबत ओबीसी वर्गामध्ये मोठी नाराजी असल्याचं चित्र आजच्या काँग्रेसने घेतलेल्या मेळाव्यातून स्पष्टच पाहायला मिळालं. त्यामुळं लातूर काँग्रेसला घरघर लागलीय का? असा प्रश्न उपस्थित होतोय, देशमुख बंधू लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मध्येच प्रचाराचा जोर लावलाय, त्यामुळं देशमुख बंधू येणाऱ्या विधानसभेची तयारी तर करत नाहित ना? असाही प्रश्न उपस्थित होतो, जर विधानसभेची तयारी करत असतील तर लिंगायत समाजाचा काँग्रेस आणि अमित देशमुख बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.